रामटेक: वाहीटोला परिसरात पुन्हा बिबटचे दर्शन; रामटेक वनविभागाची शोध मोहीम सुरू
Ramtek, Nagpur | Jul 12, 2026 मागील 30 जूनला रामटेक मनसर मार्गावरील वाहीटोला परिसरातील मनसर माईन्सच्या ओल्ड डम्पिंगच्या सुरक्षा भिंतीजवळ एक बिबट दिसल्यानंतर आता पुन्हा शनिवार - रविवार दिनांक 11 - 12 जुलै च्या मध्यरात्री बिबट दिसल्याने बिबटचा याच परिसरात वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामवासी, पशुपालकात दहशत निर्माण झाली आहे.