मुर्तीजापूर: शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि तुषार सिंचन अनुदान आता आधी मिळणार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संच खरेदीसाठी अनुदान खरेदीपूर्वीच मिळणार आहे. शेतकरी फक्त आपला स्वहिस्सा भरून सिंचन संच खरेदी करू शकतील.