शहादा: सिमेंटचे पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर मातरला फाट्याजवळ उलटल्याने २ मजूर जागीच ठार, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
कोळपांढरी ते शहादा रस्त्याच्या दरम्यान मातरला फाट्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सिमेंटच्या पोलखाली दाबल्याने २ मजुरांचा मृत्यू झाला आहे. श्रावण भिमराव मोहीते (वय ४२) आणि प्रवीण भिला बीडकर (वय ४१ रा.उजळोदा) अशी मृतकांची नावे आहेत. याबाबत समाधान अर्जुन मोहीते यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईश्वर नरोत्तम पाटील (रा. लोणखेडा) याच्याविरुद्ध ३० मार्चला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.