कराड: कराड नगरपालिका निवडणुकीसाठी महसूल प्रशासन सज्ज; दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष मोहीम : प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
Karad, Satara | Nov 5, 2025 कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दुबार मतदारांची तपासणी सुरू आहे. मतदार यादीत ज्यांचे नाव दोन ठिकाणी आढळले आहे, त्यांच्या नावासमोर दोन ‘स्टार’ चिन्ह लावण्यात आले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. या मतदारांकडे बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना कोणताही एक पर्याय निवडण्याची संधी देणार आहेत. मतदारांनी स्वतःच्या इच्छेनुसार तो पर्याय निश्चित केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मतदान करता येईल.