बीड मध्ये गुंडाची धिंड ;
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात १ सप्टेंबर रोजी भरदिवसा रमेश उर्फ संदीप महादेव इंगोले व त्यांचे दाजी वसंत आत्माराम जुळे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची शहरातील रस्त्यांवरून तसेच विविध चौकांमधून धिंड काढली. गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याचा धाक दाखवण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.बीडमध्ये शस्त्रसज्ज हल्ला प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून चौकाचौकातून धिंड काढणे म्हणजे कायद्याचा धाक दाखवणारी कारवाई आहेअसे बोलले जाते #बीडपोलिस #बीड #बीडपोलीसअधिक्षक