Public App Logo
Profile Picture

बीड प्रहार

@usr43100753
132Followers
0Following
बीड शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग शहराच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नामलगाव फाटा NH-52 ते म्हसोबा फाटा (NH 361F) ते पाली (NH- 52) असा बाह्यवळण (रिंग रोड) बीड शहर बायपास रस्त्याच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देऊन मागणी  करतांना बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर <nis:link nis:type=tag nis:id=आमदारबीड nis:value=आमदारबीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=संदीपक्षीरसागरबीड nis:value=संदीपक्षीरसागरबीड nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=महामार्ग nis:value=महामार्ग nis:enabled=true nis:link/>
रंजेगाव मध्ये तीन ठिकाणी घरफोड्या; रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास अंदाजित एक ते दीड लाखाचा ऐवज असल्याचे सांगितले जाते ,बीड तालुक्यातील रंजेगाव येथील बीटे, निकम ,तायड, यांच्या घरी घडलेल्या घटना असून पिंपळनेर पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ,यापूर्वी देखील हद्दीत अनेक घटना घडल्या मात्र घटनेचा शोध पोलिसांना लागला नाही हे दुर्दैव आहे
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर मकोका लावा ,
बीड प्रहार विशेष 
"Safe Food, Safe Maharashtra" मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात तेल रीपॅकिंग उद्योगांवर FDA ची मोठी धडक कारवाई केल्याने ऑईलमील धारकामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जनतेच्या आरोग्याशी हे ऑईलमील वाले खेळत असून यांच्यावर मकोका सारखी कारवाई करण्याची मागणी होत असून अश्या कठोर कारवाया झाल्यानंतर असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे सामान्य जनतेतून बोलले जाते .
 बीड जिल्ह्यातील वडवणी,माजलगाव आणि बीड शहरातील एमआयडीसी भागात एफडीए ने चांगलाच कारवाईचा दणका दिला असून यामध्ये मेसर्स स्वागत ऑईल इंडस्ट्रीज, प्लॉट नं. 83, MIDC बीड, मेसर्स चरखा ऑईल मिल, प्लॉट नं. 52, MIDC बीड,मेसर्स जय हनुमान ट्रेडर्स, वडवणी, मे. जान्हवी कमर्शियल्स, जुना मोंढा, माजलगाव ,मे. विनायक ऑईल इंडस्ट्रीज, जुना मोंढा, माजलगाव या ऑईलमील चा समावेश असून  अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या _Safe Food, Safe Maharashtra_ या विशेष मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात दिनांक 06 व 07 ऑगस्ट 2026 रोजी तेल रीपॅकिंग उद्योगांवर धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त  श्रीकांत करकळेव सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये मेसर्स स्वागत ऑईल इंडस्ट्रीज, प्लॉट नं. 83, MIDC बीड - दि. 06/08/2026तपासणी दरम्यान खालील गंभीर अनियमितता आढळून आल्या:- Reused Tins चा मोठ्या प्रमाणावर वापर एकाच टाकीतील तेल "रिफाइंड" व "अल्ट्रा रिफाइंड" म्हणून छापून ग्राहकांची फसवणूक, परिसर अस्वच्छ, In-house Laboratory व COA उपलब्ध नाही, Technical व्यक्ती नाही, Food Grade प्रमाणपत्रे नाहीत, साठवण टाक्या अस्वच्छ, कामगारांचे Medical Certificate व Pest Control रेकॉर्ड नाही
 संशयित निकृष्ट दर्जाचा एकूण 66,652.6 किलो खाद्यतेल किमत रु. 1,05,85,236/जप्त करण्यात आला. त्यात रिफाइंड सोयाबीन, पाम तेल व स्वागत गोल्ड, गुडलुक, स्वस्तिक ब्रँडचा पॅक तेल समाविष्ट आहे.  10 Enforcement नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. परवाना देखील रद्द करण्यात आला आहे व आस्थापना तात्काळ बंद करण्यात आली.तसेच  मेसर्स चरखा ऑईल मिल, प्लॉट नं. 52, MIDC बीड या ठिकाणी - दि. 06/08/2026 तपासणी दरम्यान वरीलप्रमाणेच Reused Tins, लेबलिंगमध्ये फसवणूक, अस्वच्छता, COA/लॅब/रेकॉर्डचा अभाव आढळला. एकूण 45,995.7 किलो खाद्यतेल किमत रु. 78,22,050/जप्त. त्यात रिफाइंड सोयाबीन, पाल्मोलिन, राईस ब्रान व शुभम, अनुज ड्रॉप, शुभम अल्ट्रा ब्रँडचा समावेश.  
व 11 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले.  व परवाना रद्द करून आस्थापना बंद करण्यात आली.
 मेसर्स जय हनुमान ट्रेडर्स, वडवणी, जि. बीड - दि. 07/08/2026 याठिकाणीअस्वच्छ परिसर, Reused Tins, लॅब/COA/मेडिकल प्रमाणपत्र/पेस्ट कंट्रोल रेकॉर्डचा अभाव आढळला. एकूण 4,545.2 किलो खाद्यतेल किमत रु. 7,24,596/ जप्त. त्यात सोहम ब्रँड पाल्मोलिन व खुले सोयाबीन, पाल्मोलिन तेलाचा समावेश.  3 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले व परवाना रद्द करून आस्थापना बंद करण्यात आल मे. जान्हवी कमर्शियल्स, जुना मोंढा, माजलगाव - दि. 07/08/2026बॅच नंबर/लेबल नसले सुट्टे तेल असुरक्षितरित्या साठवले आढळले. एकूण 1,746 किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल* किमत रु. 2,79,360/ जप्त.  2 Enforcement नमुने तपासणीसाठी पाठवले.  License Forthwith Suspendedकरून आस्थापना बंद करण्यात आली मे. विनायक ऑईल इंडस्ट्रीज, जुना मोंढा, माजलगाव - दि. 07/08/2026वरीलप्रमाणेच Reused Tins, अस्वच्छता, COA/रेकॉर्डचा अभाव.248 किलो सुट्टे रिफाइंड सोयाबीन तेल किमत रु. 39,680/ जप्त.  
Enforcement नमुना तपासणीसाठी पाठवला.  
License Forthwith Suspendedकरून आस्थापना बंद करण्यात आली.अश्या विविध बेधडक कारवायांमध्ये एकूण जप्तीचा आकडा सुमारे 1,19,187.5 किलो खाद्यतेल, किमत रु.1,94,50,922/ असा असून सदरील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. घोपे, मूळे, अजय गाढे, ठोंबरे, खंदारे, खाडे, गणेश दत्तू, रोहित फांदी, अंकुश नरवडे, सिद्धांत खंदारे, बोचरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली .
बीड मधील बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईस येथील बिर्याणी खाल्ल्याने महिलेस विषबाधा झाल्याचा गंभीर आरोप होत असून याबाबत सदरील महिलेने संबधित विभागाकडे रीतसर तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे
एफडीए चा बीड जिल्ह्यातील ऑईलमील चालकांना दणका,,,
मनोज जरांगे पाटील शिंदेसेनेवर संतापले ,आमच्या विरोधात बैठका घेता ,तुमच्यासाठी आम्हीं खस्ता खाल्ल्या असे म्हणत केला संताप व्यक्त <nis:link nis:type=tag nis:id=जरांगेपाटील nis:value=जरांगेपाटील nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शिवसेना nis:value=शिवसेना nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=मराठाआरक्षण nis:value=मराठाआरक्षण nis:enabled=true nis:link/>
लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा केला जातो ,भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी गाड्या ओढून पूर्ण करण्याची परंपरा आजही कायम आहे असाच यात्रा उत्सव टाकरवन येथे साजरा करतांना ग्रामस्थ
कुक्कडगाव येथील गंभीर प्रकार ;70 ते 80 एरकरमधील पिकावर तणनाशकचा परिणाम
  बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे करवा नामक मालकाच्या सोलर प्लांट मध्ये तणनाशक एसटीपी पंपाच्या साह्याने फवारण्यात आले यामुळे शेजारील शेतकऱ्याच्या कापूस तूर पपई पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे पूर्वी संपर्क केल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणणाऱ्या करवा सोलार प्लांट वाल्यांनी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ची मागणी केली असता हात वर केले आहेत या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे वर्षभरात  मेहनत वाया जात आहे. सोलर प्लांट मालक करवा याच्यावर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच करवा याच्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे याकरवानामक सोलार प्लांट धारकावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे
महेश डोंगरे पाटील व नवनाथ वाघमारे यांच्यात बाचाबाची ,,,
सर्वत्र यांचीच चर्चा
बीड चा नादच करायचा नाही 
 - कसाय बस थांबा 
चक्क छोट्या बस थांबात चक्क म्हैस बांधली असून 
गेवराई तालुक्यातील काठोडा तांडा येथील हा प्रकार आहे . लोकप्रतिनिधी, अधिकारी, गुत्तेदार यांनी,रस्ता लगत सामान्य जनतेला ऊन, वारा, पाऊस सुरक्षेसाठी प्रवासी बस थांबा निवारा उभा केला,मात्र या ठिकाणी काही लोकांनी चक्क म्हशीसाठी निवारा केला आहे .
<nis:link nis:type=tag nis:id=maharashtra nis:value=maharashtra nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=beed nis:value=BEED nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=beedkar nis:value=beedkar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=beednews nis:value=beednews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=busstop nis:value=busstop nis:enabled=true nis:link/>
45 लाखाची लाच घेणारा सामाजिक वनीकरण चा हा लाचखोर अधिकारी श्रीनिवास लखमावाडला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा कळस !गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ही भीषण परिस्थिती; पाचकोटींचा निधी खर्च झाला तर ही परिस्थिती अजून कशी ? चौकशी समिती नेमली त्या समितीला हे भीषण वास्तव दिसते का? <nis:link nis:type=tag nis:id=महावितरणगेवराई nis:value=महावितरणगेवराई nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=महावितरणबीड nis:value=महावितरणबीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आमदारगेवराई nis:value=आमदारगेवराई nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जिल्हाधिकारीबीड nis:value=जिल्हाधिकारीबीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विद्युतमंत्रीमहाराष्ट्र nis:value=विद्युतमंत्रीमहाराष्ट्र nis:enabled=true nis:link/>
नगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मराठवाडा मुक्ती दिन (१७ सप्टेंबर २०२६) पर्यंत प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या  राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच स्थानिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
बीडचे नेते मूग गिळून गप्प ;राजेंद्र आमटे व बाळासाहेब मोरे यांनी पिकविम्यासाठी आवाज उठवला,,
नेत्यांच्या मागे आतमध्ये प्रवेश करणारांना पोलिसांनी रोखले ,,,
रेशनच्या तांदळात उंदराच्या लेंड्या बीडच्या पुरवठा विभागाला गांभीर्य नसून गोरगरीब जनतेने हेच निकृष्ट अन्न धान्य खाऊन आरोग्य धोक्यात घालायचे का? <nis:link nis:type=tag nis:id=जिल्हाधिकारी nis:value=जिल्हाधिकारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बीड nis:value=बीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पूरवठाविभागबीड nis:value=पूरवठाविभागबीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=तहसीलदारबीड nis:value=तहसीलदारबीड nis:enabled=true nis:link/>
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुवर्य सदगुरू किसान बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
सोयाबीन चे पाने अशी कुरतडली जात आहेत ,नेमका कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे ,कोणती औषधी फवारली पाहिजेत? कृषी विभाग आणि शेती तज्ञ यांनी मार्गदर्शन करावे
वाळूचे टिप्पर सुसाट ;शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका टाकरवन परिसरातील ही विदारक परिस्थिती असून  ही होत असलेली वाळूची तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ?
धक्कादायक-उल्हासनगरमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ च्या पोलिसांनी आरोपी आई आशा गरड हिला अटक केली आहे .
रेशनच्या तांदळात उंदराच्या लेंड्या बीडच्या पुरवठा विभागाला गांभीर्य नसून गोरगरीब जनतेने हेच निकृष्ट अन्न धान्य खाऊन आरोग्य धोक्यात घालायचे का? <nis:link nis:type=tag nis:id=जिल्हाधिकारी nis:value=जिल्हाधिकारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बीड nis:value=बीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पूरवठाविभागबीड nis:value=पूरवठाविभागबीड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=तहसीलदारबीड nis:value=तहसीलदारबीड nis:enabled=true nis:link/>
लेकीचा प्रेमविवाह झाल्याने संतप्त आईने श्रीरामपूरात धावत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा  प्रयत्न केल्याचे बोलले जाते, श्रीरामपूरमध्ये प्रेमविवाहानंतर कौटुंबिक वादाचे नाट्यमय रूप पाहायला मिळाले. धावत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न करतांना महिला दिसत आहे .
जिल्हाध्यक्ष टाकले मात्र मुख्यमंत्री विसरले ?
माजलगावच्या बॅनरची सर्वत्र चर्चा ; मुख्यमंत्री यांचा फोटो का नाही?माजलगाव मध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्स वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब झाला असून जिल्हाध्यक्ष यांचा फोटो विसरले नाही मात्र मुख्यमंत्री यांचा विसर पडलाच कसा अशी चर्चा सुरू झाली आहे.
दारूबंदी साठी महिलांचा पुढाकार
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून ,याचा फटका महिला मुलांना आणि सर्व कुटूंबना होत असून तात्काळ दारूबंदी करण्यात यावी यासाठी आता महिला पुढे आल्या असून यासाठी आता पहिल्यांदा अंधापुरी गावच्या महिलांनी नेकनुर पोलीस स्टेशनला दारू बंदीसाठी निवेदन देऊन पुढाकार घेतला आहे तर आता सर्व परिसरातील महिलांनी देखील असाच पुढे होऊन लढा देणे गरजेचे आहे