यावल: यावल तालुक्यातील आंबा पाणी येथे फवारणीचे औषध असलेल्या ग्लासमध्ये नजरचुकीने पाणी पिल्यामुळे विषबाधा होऊन महिलेचा मृत्यू
Yawal, Jalgaon | Dec 3, 2025 यावल तालुक्यात आंबा पाणी हे गाव आहे. या गावातील महिला सायरा मुन्ना पावरा वय ४७ या महिलेने नजरचुकीने फवारणीचे औषध भरलेल्या ग्लासामध्ये न धुता पाणी पिऊन घेतले. दरम्यान तिला विषबाधा झाली व तिला उपचारा करीत यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. इथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे