पैठण पाचोड मार्गावरील दावरवाडी शिवारातील वीरभद्रा नदीच्या पुलाजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधावपणे जाणारा एक दहा टायर क्रमांक एम एच 21 एक्स 4286अचानक पलटी झाला दरम्यान सदर ट्रक सोलापूरहून बिडकीन येथे कोंबडीचे खाद्य घेऊन जात होता अपघातानंतर ट्रक मधील खाद्याच्या ब्यागा रस्त्यावर पडल्या होत्या यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता सुदैवाने या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली