महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत महिला सुरक्षा, कायदेशीर हक्क, छेडछाड व लैंगिक अत्याचाराविरोधातील कायदेशीर तरतुदी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा तसेच ‘ड्रग फ्री कॅम्पस’ संकल्पनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
“घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे.” असा संदेश देत पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
अडचणीच्या प्रसंगी महिला व नागरिकांना तात्काळ मदतीसाठी डायल 112 या आपत्कालीन सेवेशी संपर्क साधता येईल.
महिलांचा सन्मान • सुरक्षितता • स्वावलंबन
सक्षम महिला… सक्षम कुटुंब… सक्षम समाज!
#GadchiroliPolice #WomenSafety #WomenEmpowerment #MahilaDakshataSamiti #Dial112 CyberSafety MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mramesh_ips
Gadchiroli, Maharashtra | Aug 22, 2026