धुळे: आ. राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी एमआयएम पक्षाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
Dhule, Dhule | Sep 3, 2024 भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी. एक सप्टेंबर सोमवार रोजी अहमदनगर ते रामगिरीच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे अहमदनगर येथे भाजप नेते राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळेस आमदार राणे हे पोलीस प्रशासनासमोर उघडपणे मशिदीत घुसून मुस्लिमांना निवडून मारतील अशी धमकी देत होते. यामुळे मुस्लिम समाजाला खडबड माजेल आणि त्यांनी दंगली घडवण्याची संधी मिळेल. अशी लोक समाजात राहण्यास योग्य नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.