धुळे: पारोळारोड परिसरात रस्त्याच्या कडेला नालीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खडबड
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत पारोळा रोड येथील शेतकरी पुतळ्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत एक अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे, मृताचे वय अंदाचे 25 ते 30 वर्ष असून सदर मयताचे उजव्या हातावर बाण असलेला बदाम व त्यात मा हे अक्षर मराठीत गोंदलेले आहे, मयताची ओळख पटविण्याचे काम आझाद नगर पोलिसांतर्फे सुरू आहे.