धुळे: आर्वी शिवारात दुचाकी अपघातात दोन जणांच्या मृत्यू , धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात शनिवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन दुचाकीनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुसुंबा तालुक्यातील रहिवासी सुरेश संजय अहिरे (वय ३०) आणि अजय उखा सोनवणे (वय २४) हे दोघेही दुचाकीवरून आर्वीकडे येत असताना मागून येणारा दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.