धुळे: नितेश राणे यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने लोकमान्य हॉस्पिटल चौक परिसरात निषेध आंदोलन
Dhule, Dhule | Sep 3, 2024 भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केले आहे. यावेळी संतप्त समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध देखील व्यक्त केला आहे.