राजुरा शहरातील विविध भागांत लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात अखेर आज दि 27 नोव्हेंबर ला 12 वाजता काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे धाव घेत अन्यायाची माहिती दिली.