यवतमाळ: शहरातील मोहा येथील दूध डेरीच्या बाजू उभी दुचाकी अज्ञात चोरट्याने केली लंपास ;शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ शहरातील मोहा येथील दूध डेरीच्या दुकानाच्या बाजू उभी करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एम एच 29 एएल 8320 किंमत 15 हजाराची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी 2 जून रोजी ज्ञानेश्वर काटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.