यवतमाळ: शहरातील नेताजी चौक परिसरात चालत्या टाटा एस वाहनातून खाली पडून युवक जखमी
यवतमाळ शहरातील नेताजी चौक परिसरात 1 जूनला सायंकाळच्या सुमारास टाटा एस मालवाहू वाहन जात असताना चालत्या वाहनातून एक जण खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.गणेश लोणकर असे वाहनातून खाली पडून जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात घडताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व त्यांच्या पथकाने जखमीला शासकीय रुग्णालय येथे दाखल केले.परंतु प्रकृती गंभीर असल्याने जखमी युवकास नागपूर येथे हलविण्यात आले.