शहादा: सुलवाडे येथे धक्का का मारतो असे विचारले म्हणून राग आल्याने युवकाचा खून, म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील सुलवाडे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ नाचताना धक्का लागला असे विचारले म्हणून एकाला राग आल्याने लोखंडी चाकूने छातीवर गंभीर वार करून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सुकलाल रघुनाथ पवार या युवकाचा खून झाला आहे. याप्रकरणी योगेश रघुनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सोमनाथ गेंदल सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.