रामटेक: सत्रापूर येथील शेतात वाघाच्या हल्ल्यात गाय मृत
Ramtek, Nagpur | Jun 19, 2026 रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मनसर जवळील सत्रापूर येथील पशुपालक व शेतकरी बळवंत डेंगरे हे आपल्या शेतात पशुंना चारून परत आणत असताना अचानक एका वाघाने हल्ला केल्याने एका गाईला आपला जीव गमवावा लागला. वाघाच्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना गुरुवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडल्याचे कळते. या घटनेनंतर वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.