कर्जत: कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील पुलाचे काम प्रगतीपथावर
Karjat, Raigad | May 9, 2026 कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ वाल्मिकी नगर येथील असलेल्या ब्रिटीश कालीन पुलाचा मधला ठेव्याचा ओढ्यातील पाण्याच्या होणाऱ्या माऱ्यामुळे दगडी धासल्याने वाहतूकीसाठी हा पूल धोकादायक म्हणून पोलीस व संबंधीत विभागाचे अधिकारी तसेच नागरिकांच्या सर्तकपणामुळे हा जिर्ण पुल हा तात्काळ बंद करण्यात आला होता. तर सदर रस्ता रुंदीकरण कामा दरम्यान शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या नवीन पुल हा वाहतुकी खुला करण्यात आला होता.