पेण: पेण-खारेपाटला मिळणारे पिण्याचे पाणी दूषित
Pen, Raigad | Apr 6, 2026 पेण तालुक्यातील खारेपाट भागातील समस्या संपता संपेना, खारेपाट भागात पिण्यासाठी येणारे पाणी दुषित असल्याने अनियमित येत असुन येणारे पाणी सुद्धा अशुद्ध अयोग्य आहे असा निकष जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळेतुन दिला असल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी यांच्या मार्फत खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने पाठवलेले पाणी शुद्धीकरण, सनियंत्रण व टीसीएल गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.