पोलादपूर: कशेडी घाटातील 'डेंजर झोन'चे काम रखडले; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील २००५ पासून खचणाऱ्या १०५ मीटरच्या 'डेंजर झोन' रस्त्यावर १५ मेपर्यंत काम पुर्ण होणे अपेक्षित असताना अमेरिका इराण युद्धामुळे कशेडी घाटातील 'डेंजर झोन'चे काम रखडलेअसल्याचा दावा जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी केला आहे. आगामी पावसापुर्वी रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास स्थानिकांकडून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.