सावनेर: सावनेर : रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा, दुर्घटनेचा तपास सुरू
Savner, Nagpur | Jul 30, 2026 सावनेर : रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा, दुर्घटनेचा तपास सुरू वैभव काकडे सावनेर, दि. ३० जुलै : सावनेर शहरात गुरुवारी (३० जुलै) सकाळी अंदाजे १०.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत सख्ख्या दोन भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सावनेर शहरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृतांची ओळख निरंजन लक्ष्मण फ