पालघर: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर नालासोपारा येथे भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला आनंद उत्सव
भारतीय लष्कराने पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नालासोपारा येथे आनंदोत्सव साजरा केला. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर यावेळी पेढे वाटून, भारताच्या व भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. आमदार राजन नाईक, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले.