कर्जत: कर्जतला विद्यापीठातील 'उत्कृष्ट संशोधन केंद्र' पुरस्कार जाहीर
Karjat, Raigad | May 22, 2026 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा 'उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार' कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला प्रदान करण्यात आला आहे. दापोली येथील विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्यात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.