इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 20 फेब्रुवारीला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रीतम विद्याधर वानखेडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.