भोकरदन: पारध येथे पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपी आजाराची लस
आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील पारध येथे पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांना लंबी आजाराची लस देण्यात आली आहे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक पाऊल पुढे टाकत ही लस अगोदरच द्यायला सुरुवात केली आहे, यावेळी सुमारे 170 जनावरांना ही लस देण्यात आली आहे, या लसीकरण मोहिमेला शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळत आहे.