धुळे: गणेश उत्सव व ईद मिलाद सणानिमित्त सुविधा द्या, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन
Dhule, Dhule | Sep 4, 2024 धुळे शहरातील रस्त्यांची सध्या झालेली दयनीय अवस्था बघता त्याचबरोबर रस्त्यावरील दीपस्तंभ बहुतांश ठिकाणी बंद असून, आगामी गणपती उत्सव त्याचबरोबर ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. नागरिकांना सुविधा पुरविण्यात न आल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.