पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ! दुचाकीला कारची धडक; वार्डबॉय तरुण गंभीर जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय पोलादपूर समोर दुचाकी स्वार वार्डबॉय तरुण यास कारची पाठीमागून ठोकर लागून वार्ड बॉय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. किरण गौतम बाविस्कर हा आपल्या ताब्यातील एक्टिवा घेऊन महामार्गावरून पोलादपूर दिशेने कामानिमित्त जात असताना त्याचदरम्यान पाठीमागून मुंबई बाजू कडून महाबळेश्वर कडे जाणारी महिंद्रा मरांझो कार चालक हर्ष दिनेश कुमार पटेल यांनी अति वेगाने कार चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरच्या दुचाकी ला पाठीमागून ठोकर मारून अपघात केला.