🔥 मुंबईत हावडा एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारला आग; CSMT यार्डमध्ये थरार
मुंबईतील CSMT यार्डमध्ये उभी असलेल्या हावडा एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये पहाटे सुमारे ३:४० वाजता आग लागली. पॅन्ट्री कारमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसल्यानंतर अग्निशमन दलाला तातडीने माहिती देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी पोहोचून काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग ट्रेनच्या इतर भागात पसरण्यापासून रोखली.
घटनेच्या वेळी ट्रेन रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
#Mumbai #CSMT #HowrahExpress #TrainFire #BreakingNews
Pune City, Pune | Sep 30, 2026