Times Of Maharashtra News Impact : टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या बातमीचा 6 तासात इम्पॅक्ट! वडगाव शेरीतील अनधिकृत कार वॉशिंग सेंटरवर PMC ची कारवाई
पुणे : ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या बातमीनंतर वडगाव शेरीतील अनधिकृत कार वॉशिंग सेंटरवर पुणे महापालिकेच्या बांधकाम व अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली.
९ बीआरडी एअर फोर्स स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील संवेदनशील परिसरात हे कार वॉशिंग सेंटर सुरू असल्याचा मुद्दा ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ने उपस्थित केला होता. संबंधित ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
महापालिकेने २४ तासांची नोटीस दिल्यानंतरही कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल बातमीत उपस्थित करण्यात आला होता. तसेच न्यायालयात स्थगिती अर्ज फेटाळल्यानंतरही कारवाई का होत नाही, याबाबतही प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले होते.
बातमीनंतर महापालिकेचे बांधकाम आणि अतिक्रमणविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तेथील अनधिकृत साहित�
Pune City, Pune | Sep 30, 2026