पेण: गणेशमूर्तीच्या दरात यंदा २५ टक्के वाढ
Pen, Raigad | Jun 10, 2026 अमेरिका, इराण, इस्त्रायल यांच्यातील युद्धजन्य स्थितीचा फटका यंदा गणेश मूर्तीनाही बसला आहे. इंधनासह अनेक वस्तू महागल्यामुळे बाप्पाच्या मूर्तदिखील महागणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येत असलेल्या गणेशमूर्तीच्या किमतीत २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय गणेश मूर्तिकारांनी घेतला आहे. इंधनासह वाहतूक, प्लास्टिक, रंगांचे साहित्य महागल्याने ही दरवाढ केली जात आहे.