📢 तक्रार निवारण दिवस – प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये आयोजन
नागरिकांच्या तक्रारींचे जलद, पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत प्रत्येक शनिवारी "तक्रार निवारण दिवस" आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत :
🔹 मा. श्री. निकेतन कदम (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन दर्यापूर येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने सुनावणी करून तात्काळ निराकरण करतील.
🔹 मा. श्री. दत्ता तोटेवाड
अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी करतील.
तसेच संबंधित विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) हे देखील आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करतील.
📍 नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी व अडचणी मांडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने "तक्रार निवारण दिवस" २७ जून रोजी १०:३० वा उपक्रमात सहभागी व्हावे.
अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर. 🚔
#AmravatiRuralPolice
#TakrarNivaranDin
#CitizenFirst
#MaharashtraPolice
#PublicService
102 views | Amravati, Maharashtra | Jun 26, 2026