कर्जत: कर्जतमध्ये 'हर घर नल से जल' स्वप्न अपूर्णच
Karjat, Raigad | Mar 31, 2026 कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत 2022 पासून घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र प्रत्यक्षात कर्जत तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी अनेक अडचणींमध्ये अडकलेली दिसून येत आहे. उन्हाळा तोंडावर असताना पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण न झाल्यास, ग्रामीण भागात पुन्हा एकदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.