नागपूर शहर: मानकापूर उडानपुलावर महानगरपालिका वाहन चालकाच्या कहर, उडान पुलावरील वाहनांना दिली धडक, मोठी दुर्घटना टळली
21 फेब्रुवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर उडाणपूलावर महानगरपालिका वाहन चालकाने दोन ते तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र महानगरपालिका वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला मानकापूर पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये दोन ते तीन वाहनांना धडकने दिल्यानंतर महानगरपालिकेचे वाहन थेट डिव्हायडरवर चढले. सुदैवाने मोठा अपघात टळला याबद्दलची अधिक माहिती पीडित व्यक्तीने दिली आहे.