जाफराबाद: वरुड ,माहोरा ,सिपोरा ,आंभोरा, भारज परिसरात वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने आंबा बगीचांचे नुकसान
आज दिनांक 31 मार्च 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने काल दिनांक 30 मार्च 2016 वार सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास अंबा उत्पादक शेतकऱ्यांची मोठे नुकसान केले असल्याचे पाहायला मिळाले असून यामध्ये तालुक्यातील वरुड, माहोरा,सिपोरा ,अंभोरा , भारज यासारख्या संपूर्ण तालुक्यात ठीक ठिकाणी आंबा बगीचांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.