पेण: पेणमध्ये अवकाळीतील आंबा-काजूच्या बागांचे पंचनामे पूर्णत्वास
Pen, Raigad | Jun 1, 2026 एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विशेष करून पेण तालुक्यातील आंबा आणि काजूच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकताच आलेला मोहोर गळून गेल्याने हे पिक घेणारे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र राज्य सरकारने झालेल्या अवकाळी पावसाची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत, तातडीने महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या आंबा आणि काजू उत्पादकांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर झालेल्या पंचनाम्यांचा आढावा आणि अपेक्षित निधीबाबत कृषी विभागाने निधी मंजूर होण्यासाठी आपला प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवला आहे.