भंडारा: करचखेडा फाटा येथे अवैध रेती वाहतूक: कारधा पोलिसांकडून ३० लाखांचा टिप्पर जप्त; चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा तालुक्यातील कारधा पोलिस स्टेशन परिसरामध्ये अवैध धंदे आणि रेती चोरीवर कारवाई करण्यासाठी केलेल्या पेट्रोलिंग दरम्यान, दिनांक १० डिसेंबर रोजी रात्री ११:४० वाजता, मौजा करचखेडा फाट्याजवळ येथे मोठी कारवाई करण्यात आली. भिलवाडा ते खमारी रोडने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, करचखेडा फाट्यासमोरून येत असलेला एम.एच. ४० सी.एस. २७४३ क्रमांकाचा टिप्पर पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहून टिप्पर चालक पळून गेला, मात्र क्लीनरला ताब्यात घेण्यात आले.