आम्हाला सगळ माहितीये, काय शिजतंय; हेच आम्ही बघतोय.. विजय वड्डेटीवार" राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे गट एकत्र आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली.