कर्जत: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले
Karjat, Raigad | Mar 31, 2026 माथेरानमधील विविध प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर एम एम आर डी ए च्या आलेल्या फंडातून क्ले पेव्हर ब्लॉक बसवून धूळ विरहित रस्ते बनविण्यात आले होते या रस्त्यांमुळे जमिनीची होणारी धूप थांबली परंतु या रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या ब्लॉक चा दर्जा निकृष्ट असल्याने त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले असून या विरोधात अश्व चालकांनी वारंवार तक्रार करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र माथेरानमध्ये आहे.