राष्ट्रीय जंत नाशक दिन २७ आक्टोम्बर २०२७
2.8k views | Gondia, Maharashtra | Oct 26, 2026 *गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम उद्या, २७ ऑक्टोबरपासून सुरू!* *३ नोव्हेंबरला मॉप अप राऊड; एकही पात्र लाभार्थी जंतनाशक गोळीपासून वंचित राहू नये – अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे* गोंदिया, दि.२६ ऑक्टोबर : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्हा समन्वय समितीची सभा आज, दि.२६ ऑक्टोबर रोजी अपर जिल्हाधिकारी मा.अभिजीत घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम उद्या, दि.२७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, दि. ३ नोव्हेंबर रोजी शिल्लक राहीलेल्या बालकांसाठी मॉप अप राऊड राबविण्यात येणार आहे.या मोहिमेदरम्यान एकही पात्र लाभार्थी जंतनाशक गोळीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मा.अभिजीत घोरपडे यांनी दिले. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.राजेश बेळमकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.विजय आखाडे, जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी गोरेगाव डॉ.विनोद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी आमगाव डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तालुका आरोग्य अधिकारी गोंदिया डॉ.निलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ.दर्शना नंदागवळी, तालुका आरोग्य अधिकारी सडक अर्जुनी डॉ.प्रणीत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी मोरगाव डॉ.सुकन्या कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा डॉ.अमित खोंडनकर, ग्रामीण रुग्णालय गोरेगावचे डॉ.विजय पटले, ग्रामीण रुग्णालय रजेगावचे डॉ.संजय माहुले आदी उपस्थित होते.