जाफराबाद: टेंभुर्णी देऊळगाव राजा मुख्य रोडवर गणेशपुर फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत माजी सरपंचाचा मृत्यू
आज दिनांक 17 मे 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील माजी सरपंच विष्णू विठोबा जमदाडे व 70 वर्ष यांचा दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत टेंभुर्णी देऊळगाव राजा मुख्य रोडवर गणेशपुर फाट्यावर डोक्याला मार लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी चर्चा संपूर्ण गावभर रंगत आहे.