आयुक्त संजय काटकर सर यांच्याकडून बीड येथे मराठवाडा विभागातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा*
4k views | Jalna, Maharashtra | Oct 30, 2026 बीड जिल्ह्याच्या आरोग्याविषयक कामगिरीबाबत समाधान; कुटुंबकल्याण कार्यक्रमात राज्यात जिल्ह्याला प्रथम क्रमांक बीड, दि. ३० ऑक्टोबर : मराठवाडा विभागातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी माननीय आयुक्त श्री. संजय काटकर यांनी आज बीड येथे भेट देऊन विभागातील विविध आरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्य सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील 14787 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर मा.ना. प्रकाश आबिटकर साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आयुक्त श्री. संजय काटकर सर यांचे आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या आढावा बैठकीमध्ये 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान, सेवा संकल्प अभियान, तिशीचा पल्ला तपासणी अन सल्ला, कुटुंबकल्याण कार्यक्रम तसेच आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कुटुंबकल्याण कार्यक्रमात बीड जिल्ह्याची महाराष्ट्रात अव्वल कामगिरी! कुटुंबकल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कुटुंबकल्याण सेवांचे नियोजन, जनजागृती, लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे आणि आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळे जिल्ह्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली