पॅरिसमध्ये विजांचा थरार..! आयफेल टॉवरवर कोसळली वीज; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल...
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वादळी पावसादरम्यान जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर वीज कोसळल्याचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
३३० मीटर उंच टॉवरच्या शिखरावर विजेचा लोळ आदळताच संपूर्ण परिसर क्षणभर उजळून निघाला. हा नेत्रदीपक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जगभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
तज्ज्ञांच्या मते, आयफेल टॉवरवर दरवर्षी अनेक वेळा वीज कोसळते. मात्र, आधुनिक 'लाइटनिंग प्रोटेक्शन सिस्टीम'मुळे टॉवर आणि पर्यटकांची सुरक्षितता कायम राहते.
🎥 (व्हिडिओ सौजन्य) : SylvainFreres (X)
#EiffelTower #Paris #France #Lightning #Storm #ViralVideo #Weather #Travel #LatestNews