हिंगणा: समृद्धी महामार्गावर हिंगणा एन्ट्री पॉइंट जवळ ट्रक उलटून 24 वर्षे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Hingna, Nagpur | Apr 25, 2026 समृद्धी महामार्गावरील हिंगणा एण्ट्री पॉइंटजवळभरधाव वेगातील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. ज्यामध्ये ट्रकखाली दबून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका चुकीच्या वळणाने मध्यप्रदेशातील एका कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला विवेक भीमराव ठाकरे (वय २४) हा आपला ट्रक (क्र. एमएच ४०/सीएन ७९४०) घेऊन वणीहून जबलपूरच्या दिशेने निघाला होता. हिंगणा हद्दीतील गेल गॅस सबस्टेशनजवळ काळ उभा होता.