बालाजीनगर SRA संमती घेण्याची घाई का ? प्रकल्पाची माहिती गायब, बिल्डर कोण ? नागरिकांमध्ये चर्चा.
पिंपरी-चिंचवडमधील बालाजीनगर येथील प्रस्तावित एसआरए (SRA) प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला असून, कोणतीही अधिकृत माहिती किंवा बिल्डरचे नाव जाहीर न करता संमती पत्रकांवर स्वाक्षऱ्या घेण्याची घाई सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
जोपर्यंत प्रकल्पाची पारदर्शक माहिती दिली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या न करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
#balajinagar #sra #pimprichinchwad #pcmc #sraproject
Pune City, Pune | Aug 30, 2026