पोलादपूर: वनव्याने चंदन बाग उद्ध्वस्त; शेतकरी धर्मेश रिंगे यांचे मोठे नुकसान
लहुळसे गावातील शेतकरी धर्मेश रामचंद्र रिंगे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली चंदन आणि सुरा झाडांची बाग नुकत्याच लागलेल्या वनव्यात मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. वनव्याच्या ज्वाळांनी काही तासांतच शेतकऱ्याच्या कष्टांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. आगीत अनेक चंदन व सुरा झाडांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी काढलेल्या छायाचित्रांमध्ये वनव्याच्या ज्वाळा अजूनही धुमसत असल्याचे दिसून येते.