जाफराबाद: कुंभारझरी येथील 2 जिवलग मित्रांचा देवदर्शनासाठी जाताना अंबड छत्रपती चौकात येथे कार ट्रक अपघातात मृत्यू
आज दि.29 जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद ता.कुंभारझरी येथील सागर दीपक बोर्डे,विकास दगडोबा चव्हाण हे 2 जिवलग मित्र हे 27 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मढी येथे देवदर्शनाला कार घेऊन जात होते,त्यांचा कारचा अपघात अंबड येथे छ.शिवाजी महाराज चौकात ट्रक सोबत झाला, दोघांनाही जबर मार लागला,त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेले असता डॉ.स्वप्नील पाटील यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले, यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.