मुर्तीजापूर: मोरगाव भाकरेतील महिला प्रशासकाकडे २५ हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
मोरगाव भाकरे येथील महिला प्रशासकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी रविराज मोरे व आकाश कोकाटे यांच्याविरुद्ध उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पैसे न दिल्यास बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.