कोल्हापुरात गांजा विक्रीचा पर्दाफाश!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा, उचगाव येथे कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना अटक केली.
🔹 १० किलो गांजा जप्त — अंदाजे किंमत ₹६ लाख
🔹 एक दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट जप्त
🔹 एकूण ₹६,६०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत
दोन्ही संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून, पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
🚔 अमली पदार्थांविरोधात कोल्हापूर पोलिसांची कारवाई सुरूच!
#KolhapurPolice #AntiDrugAction #NDPSAct #Kolhapur #MaharashtraPolice
137 views | Kolhapur, Maharashtra | Oct 13, 2026