दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!
आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून कोल्हापुरातील रेल्वे फाटक परिसरातून महिला आरोपीला ताब्यात घेतले.
👮♀️ ११.५ ग्रॅम वजनाचे, ₹१,५०,००० किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
#KolhapurPolice #CrimeDetection #Kolhapur
190 views | Kolhapur, Maharashtra | Oct 18, 2026